महाराष्ट्र हे नैसर्गिक सौंदर्याने नटलेले एक राज्य आहे. येथे अनेक ऐतिहासिक स्थळे, धार्मिक स्थळे, आणि नैसर्गिक पर्यटन स्थळे आहेत. या सर्व स्थळांना भेट देण्यासाठी एमएसआरटीसीने "आवडेल तेथे प्रवास" योजना सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत, प्रवाशांना महाराष्ट्रातील कोणत्याही ठिकाणी ४ किंवा ७ दिवसांसाठी प्रवास करण्याची परवानगी दिली जाते.
योजनाचे फायदे:
महाराष्ट्रातील सर्व प्रमुख पर्यटन स्थळांना भेट देण्याची संधी
कमी खर्चात प्रवास
बसमध्ये विनामूल्य प्रवास
सामान वाहतूक
योजनाचे नियम:
या योजने अंतर्गत ७ व ४ दिवसाचे पास दिले जातील.
साध्या सेवेचे पास सर्व प्रकारच्या साध्या बसेससाठी (साधी, जलद, रातराणी, शहरी, यशवंती (मिडी) आंतरराज्य मार्गासह ग्राह्य राहतील.
निमआराम बससेवेसाठी स्वतंत्र दर निश्चित करण्यात आले नाहीत शिवशाही बससेवेसाठी देण्यात येणारा पास शिवशाही बससेवेसह साधी,निमआराम,विनावातानुकुलीत शयन आसनी या सर्व सेवांसाठीआंतरराज्य मार्गासह ग्राह्य राहील.
या योजनेअंतर्गत देण्यात येणारे पास दहा दिवस अगोदरपर्यंत देता येईल.
"आवडेल तेथे कोठेही प्रवास " योजनेचे पास नियमीत बसेस सोबतच कोणत्याही जादा बसेसमध्ये तसेच यात्रेसाठी सोडण्यात येणाऱ्या यात्रा बसमध्ये ग्राह्य राहील.
सदर पासावर प्रवास करणाऱ्या पासधारकांसाठीते पासधारक आहेत म्हणून प्रवेश नाकारू नये.
आवडेल तेथे प्रवास पासधारकांसाठी बसमधील आसनासाठी हमी देता येणार नाही,परंतु या योजनेतील पास धारकाना सदर पासावर आरक्षण भरून आसन आरक्षित करता येईल.
या योजनेअंतर्गत प्रौढ पासधारकास ३० किलो व १२ वर्षाखालील मुलास १५ किलो प्रवासी सामान विनाआकार नेता येईल.
पासधारकास आंतरराज्य मार्गावर महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाची बस जेथपर्यंत जाते तिथपर्यंत राज्य परिवहन बसने प्रवास करता येईल.
पास हरविल्यास त्याचे ऐवजी दुसरा पास देण्यात येणार नाही.वा हरविलेल्या पासाचा कोणताही परतावा दिला जाणार नाही.
सदरचा पास अहस्तांतरणीय राहील.पासाचा गैरवापर केल्याचे निदर्शनास आल्यास पास जप्त करण्यात येईल.
प्रवासात वैयक्तीक वस्तु गहाळ झाल्यास अथवा कोणतेही नुकसान झाल्यास महामंडळ त्याची जबाबदारी स्विकारणार नाही.
आवडेल तेथे कोठेही प्रवास पास योजनेंतर्गत देण्यात येणाऱ्या पासाच्या दिवसाची गणना ००.०० ते २४.०० अशी करण्यात येईल.पासाचे मुदतीच्या शेवटच्या दिवशी प्रवासी सदर पासावर २४.०० वा.नंतर प्रवास करत असेल तर पुढील प्रवासासाठी तिकीट घेणे आवश्यक राहील.
काही वेळा रा.प.बसेस उशिरा सुटल्यामुळे,मार्गस्थ बिघाड झाल्यामुळे अगर काही अपरिहार्य कारणामुळे जी बस नियोजित पोहचण्याची वेळ २४.०० पूवी होती ती २४.०० नंतर पोहचत असेल व पासधारकाचा प्रवास खंडित झाला नसल्यास पासधारकांकडून तिकीट आकार वसूल करू नये.
राप/वाह/सामान्य-८८/८०७२ दिनांक ०२/११/१९९८ - वाहतूक खाते परिपत्रक क्र.३०/१९९८ अन्वये दिलेल्या सुचनांनुसार घरातील नातलगाचा मुत्यू,भुकंप,आग लागणे, आतिवृष्टी, महापूर, नैसर्गिक आपत्ती इत्यादी कारणांमुळे पासधारकास पास रद्द करावयाचा असल्यास व त्याने तसे प्रवासाच्या तारखेपुर्वी पुराव्यासह कळविले असल्यास प्रत्येक पासामागे रु.२०/- सेवा शुल्क वसुल करून उर्वरीत रकमेचा त्यास परतावा देण्यात यावा.परंतु अशा बाबतीत सदर पासावर पुढील तारखेस प्रवास करण्याची प्रवाशाची इच्छा असल्यास त्याचा जुना पास रद्द करून त्याला नवीन पास देण्यात यावा,व त्यासाठी शुल्क आकारणी करण्यात येऊ नये.
संप / काम बंद आंदोलन यामुळे रा.प. वाहतूक बंद झाल्यामुळे प्रवासी सदर पासावर प्रवास करू न शकल्यास त्याने प्रवास न केलेल्या दिवसांचा परतावा / मुदतवाढ देण्यात येईल.सदरची मुदतवाढ / परतावा वाहतूक सुरु झाल्या पासून ३ महिने पर्यंतच्या कालावधीत देण्यात येईल.
स्मार्ट कार्ड योजने अंतर्गत देण्यात येणाऱ्या आवडेल तेथे कोठेही प्रवास पासांसाठी वरील सूचना लागू राहतील.
योजना कशी मिळवायची?
* आवडेल तेथे प्रवास योजनेचा लाभ घेण्यासाठी, तुम्ही तुमच्या जवळच्या एमएसआरटीसी बसस्थानकावर जाऊन अर्ज भरू शकता.
* अर्ज भरण्यासाठी तुम्हाला पासपोर्ट आकाराचे दोन फोटो, आणि आधार कार्डाची प्रत आवश्यक आहे.
* अर्ज भरल्यानंतर, तुम्हाला पासची किंमत भरून पास मिळेल.
योजना कशी वापरायची?
* आवडेल तेथे प्रवास पास मिळाल्यानंतर, तुम्ही तुमच्या प्रवासाला सुरुवात करू शकता.
* बसमध्ये चढताना, तुमचा पास दाखवा आणि बस चालकाकडून प्रवासाचे तिकीट मिळवा.
* प्रवासादरम्यान, तुम्ही कोणत्याही एमएसआरटीसी बसमध्ये विनामूल्य प्रवास करू शकता.
योजनाची किंमत:
* ४ दिवसाच्या साध्या सेवेच्या पासची किंमत प्रौढ व्यक्तीसाठी 1170 आणि लहान मुलांसाठी 585 रुपये आहे.
* ४ दिवसाच्या शिवशाही बससेवेच्या पासची किंमत प्रौढ व्यक्तीसाठी 1520 आणि लहान मुलांसाठी 755 रुपये आहे.
* ७ दिवसाच्या साध्या सेवेच्या पासची किंमत प्रौढ व्यक्तीसाठी 2040 आणि लहान मुलांसाठी 1025 रुपये आहे.
* ७ दिवसाच्या शिवशाही बससेवेच्या पासची किंमत प्रौढ व्यक्तीसाठी 3030 आणि लहान मुलांसाठी 1520 रुपये आहे.
0 टिप्पण्या