दि.1 मे पासून एसटी महामंडळाची धुळे ते पुणे अतिजलद बससेवा होणार सुरू
धुळे येथील राज्य परिवहन महामंडळाच्या धुळे विभागातर्फे प्रवाश्यांच्या मागणीनुसार सोमवार दि.1 मे पासून धुळे ते पुणे अतिजलद सेवा सुरू करण्यात येणार आहे.
अक्षय तृतीयाच्या मुहूर्तावर धुळे आगरास 10 नवीन बसेस देण्यात आल्या. यापार्श्वभूमीवर दि. 1 मे रोजी महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून *धुळे आगारातर्फे धुळे ते पुणे अतिजलद सेवा सुरू होईल.* सदर बस रात्री 10 वाजून 10 मिनिटांनी देवपूर बसस्थानकातुन सुटेल. सदर बस कालिका माता मंदिराजवळ असलेल्या ट्रॅव्हल्स पॉइंटवर देखील प्रवाशी घेण्यासाठी 5 ते 10 मिनिटे थांबेल त्यानंतर धुळे बसस्थानकावरून उर्वरित प्रवाश्यांना घेऊन बस ही 10 वाजून 30 मिनिटांनी पुणेसाठी मार्गस्थ होईल. धुळे येथून मार्गस्थ झाल्यावर मार्गावरील कोणत्याही बस स्थानकावर थांबणार नाही.
*_सदर बस नॉनस्टॉप पुणे येथे सकाळी जवळपास 5 ते 5:30 दरम्यान पोहचेल._* दरम्यान चाकण पासून पुढे प्रवाश्यांच्या मागणीनुसार बस थांबा घेईल. तर पुणे बसस्थानकातून रात्री 10 वाजता ही बस नॉनस्टॉप धुळे शहरातील देवपूर बस स्थानकावर येण्यासाठी मार्गस्थ होईल.
धुळे - पुणे बस ही 2 × 2 पुशबॅक सीट असलेली बीएस ६ टेक्नॉलॉजीची आरामदायी व एयर सस्पेन्शन असलेली 41 सीटर बस आहे. प्रवाश्यांच्या सोयीसाठी सदर बसचे ऑनलाइन आरक्षण देखील उपलब्ध करून देण्यात आलेले आहे.
विशेष म्हणजे या आरामदायी बसचे धुळे ते पुणे आरक्षणासह फुल तिकीट 530 रुपये तर महिला, 5 ते 12 वर्षाखालील बालकं, 65 वर्षावरील ज्येष्ठ नागरिक यांच्यासाठी अर्धतिकीट 265 रुपये असे किफायतशीर भाडे असेल. तर 75 वर्षापुढील नागरिकांसाठी अमृत ज्येष्ठ नागरिक योजना लागू असेल.
धुळे जिल्ह्यातुन दररोज मोठ्या संख्येने नागरिक पुणे जिल्ह्यात नोकरी, व्यवसाय, लग्नसमारंभ व इतर कामानिमित्त प्रवास करतात. प्रवाश्यांच्या मागणीनुसार सुरू होणाऱ्या धुळे ते पुणे अतिजलद बससेवेमुळे नागरिकांचा वेळ वाचुन आरामदायी व सुरक्षित बस सेवेचा प्रवाश्यांना लाभ होणार आहे.
0 टिप्पण्या