Advertisement

मुंबई ते पुणे महामार्गावर शिवाई बस घेणार शिवनेरीची जागा प्रवास होईल स्वस्त.

 मुंबई ते पुणे महामार्गावर लवकरच धावणार इलेक्ट्रिक शिवाई बस.

पुणे ते मुंबई  हा मार्ग महामंडळालासाठी कायम नफा देणारा आणि गर्दीचा मार्ग म्हणून ओळखला जातो. म्हणून या दरम्यान महामंडळाची शिवनेरी नावाची एक लक्झरी श्रेणीतील बस चालवली जाते. ही एक लक्झरी बस असल्याने हीचे प्रवास दरही जास्त आहे. त्यात आता प्रायव्हेट बसेस महामंडळाला मोठी टक्कर देत आहेत. यावर पर्याय म्हणून महामंडळ शिवाई बसला प्राधान्य देत आहे, कारण सध्या इलेक्ट्रिक वाहनांचे युग आहे आणि ही वाहने डिझेल वाहनांच्या तुलनेने कमी इंधन खर्चात चालवली जाऊ शकतात.

पुणे ते मुंबई दरम्यान धावणारी शिवाई बस


शिवाई बस इलेक्ट्रिक असल्याने यासाठी इंधन खर्च कमी लागतो, परिणामी याचा फायदा डायरेक्टली प्रवाशांना आणि महामंडळाला होईल. खर्च कमी असल्याने तिकीट दर ही कमी होतील. आणि यातून प्रायव्हेट बसेसच्या तुलनेने प्रवाशी शिवाई बस कडे वळतील असा महामंडळाचे नियोजन आहे. या साठी महामंडळाने शिवाई बसचे पुणे ते मुंबई प्रवास दर सेमी लक्झरी (हिरकणी बस) बसच्या समतुल्य ठेवण्याचे ठरवले आहे. 

मुंबई ते पुणे शिवाईचे तिकिट दर किती असेल :-

मुंबई ते पुणे या महामार्गावर धावणारी शिवनेरी बस सध्या ५५० रुपये इतके प्रवास दर आकारात आहे. मात्र शिवाईचे तिकीट दर ३५० रुपये इतकेच ठेवण्यात आले आहे. यामुळे निमआरमच्या श्रेणीत प्रवाश्यांना एसी बस मध्ये प्रवास कार्य येणार आहे.

कोणत्या मार्गावर धावणार आहे शिवाई बस :-

  • दादर ते पुणे स्टेशन - २४
  • परेल ते स्वारगेट - २४
  • बोरिवली ते स्वारगेट - २४
  • ठाणे ते स्वारगेट - २४
अश्या या चार मार्गांवर एकूण ९६ शिवाई बसेस धावणार आहे.

या मार्गावरील धावणाऱ्या शिवनेरी बसेस कोल्हापूर ते पुणे मार्गावर धावतील. तसेच या बसेस अन्य विभगातील प्रमुख आगारात दिल्या जाऊ शकतात. जसे नागपूर,अमरावती,नाशिक,औरंगाबाद,कोल्हापूर.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या