25 वर्षात एकही अपघात होऊ न देणाऱ्या 780 चालकांचा महामंडळातर्फे गुणगौरव पुरस्कार
26 जानेवारी हा दिवस सर्व भारतीयांसाठी एक अभिमानाचा दिवस आहे. कारण याच दिवसापासून भारतीय नागरिकांना त्यांचे हक्क संविधानामार्फत दिले गेले. म्हणून आपण हा दिवस प्रजासत्ताक दिन म्हणून मोठ्या आनंदाने साजरा करतो. या दिवशी मोठ मोठ्या पारितोषिक वितरण कार्यक्रमांचे नियोजनही केले जाते.
याच स्वरूपातील कार्यक्रम महामंडळ आपल्या चालकांचा सत्कार कार्यासाठी करणार आहे. यात महामंडळात 25 वर्षात एकही अपघात होऊ न देता कठीण परिश्रम करून प्रवाश्यांना सेवा देणाऱ्या तब्बल 780 चालकांना पारितोषिके देवून त्यांचा सत्कार करणार आहे.
यात महामंडळ चालकांना विना अपघात सेवेचा बिल्ला, स्मृतिचिन्ह, तसेच त्यांच्या पत्नीला साडी - चोळी आणि ओटी देवून त्यांचा सत्कार करणार आहे.
महामंडळ आपल्या कर्मचाऱ्यांचे प्रोत्साहन वाढवण्यासाठी अशे अनेक उपक्रम हाती घेत आहे. त्याच बरोबर MSRTC ची सर्व सामान्य प्रवाशांच्या मनातील प्रतिमा उंचावण्याचा महामंडळाचा प्रयत्न आहे.
0 टिप्पण्या