shivai bus लवकरच संभाजीनगर (औरंगाबाद) मधील प्रवाशांच्या सेवेत होणार दाखल.
हल्ली १ जून,२०२२ रोजी महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या वर्धापदिनानिमित्त पुणे ते अहमदनगर या मार्गावर शिवाई बस सुरू करण्यात आली. या बस चे वैशिष्ट म्हणजे ही बस पूर्णपणे इलेक्ट्रिक वर चालणारी बस आहे.
याच पार्श्भुमीवर आता संभाजीनगर (औरंगाबाद) आगारातही या बस चा समावेश करण्यात येणार आहे. सध्या पुणे ते संभाजीनगर (औरंगाबाद) या मार्गावर एकूण १८ शिवशाही बसेस कार्यरत आहे. आता शिवाई बस देखील यात शामिल होणार आहे.
shivai bus कधी सुरू होणार संभाजीनगर (औरंगाबाद) ते पुणे मार्गावर :-
डिविजनल कंट्रोलर सचिन शिरसागर यांनी याबाबत सांगितले की, सध्या डिवीजनल ऑफिस मध्य नवीन चार्जिंग स्टेशन उभारण्याचे कार्य जोरात सुरू आहे जसे हे कार्य पूर्णत्वाला येईल तसेच ही बस या मार्गावर सुरू करण्यात येईल. आधी ही बस ऑगस्ट मध्य सुरू होणार होती परंतु चार्जिंग स्टेशन चे कार्य अपुरे असल्यामुळे ही बस सध्या सुरू झाली नाही.
0 टिप्पण्या